अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र प्रिय गुरूजी , सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात , नसतात सगळीच सत्यनिष्ठ , हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा , जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरूषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही , मला माहित आहे! सगळया गोष्टी झटपट नाही शिकवता येत ................ तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा , घाम गाळून कमावलेला एकच छदाम , आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला , तुमच्यात शक्ती असती तर ................ त्याला दवेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष