"Let's go to the computer world" म्हणजेच "चला जाऊ संगणकाच्या विश्वात". नमस्कार विदयार्थी मित्रानों, मी सुनिल भागवत. आजचे युग हे कॉम्पुटर म्हणजेच संगणकाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येकाला कॉम्पुटरचे बेसिक नॉलेज म्हणजेच ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणुन मी आजपासुन सुरू करत आहे नवीन अशा उपक्रमाला ज्याचे नाव आहे "Let's go to the computer world" म्हणजेच "चला जाऊ संगणकाच्या विश्वात". यात आपण कॉम्पुटरच्या बेसिक म्हणजेच तुम्हाला दिसणार्या स्क्रीनपासुन ते कॉम्पुटरच्या आत असलेल्या सीपीयु, प्रोसेसर तसेच मदरबोर्ड पर्यंतच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कशा पदधतीने कॉम्पुटरचे सॉफ्टवेअर बनतात. ते बनविण्यासाठी लागणारी भाषा म्हणजेच Language कुठली? ती कशी असते? अशा सर्व गोष्टी आपण जाणुन घेणार आहोत. तसेच कॉम्पुटरच्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करू पहिल्या विषयापासुन ज्याचे नाव आहेत "कॉम्पुटर म्हणजे काय?" कॉम्पुटर हे एक मशिन आहे. जे आपली कामे सोप्या पध्दतीने करून देते आणि हो ते कधीही...
Comments
Post a Comment