Wednesday, July 1, 2020

RAILWAY RECRUITMENT BOARDS GENERAL KNOWLEDGE QUESTIONS-ANSWERS

RAILWAY RECRUITMENT BOARDS GENERAL KNOWLEDGE QUESTIONS-ANSWERS
रेल्वे भर्ती बोर्ड 




1. अण्णामय्या हे मध्ययुगीन कवी/गायक सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यांशी संबंधित आहे?

1) तामिळनाडू

2) गुजरात

3) पश्चिम बंगाल

4) आंध्र प्रदेश


उत्तर - 4) आंध्र प्रदेश




2. रेल्वे मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आलेल्या 2018 स्थानक स्वच्छता अहवालात कोणते 'A1-दर्जाचे रेल्वे स्थानक' पहिले आले?

1) कन्नूर

2) एग्मोर

3) कोची

4) मारवाड


उत्तर - 4) मारवाड




3. गौतम बुध्दांनी आपला पहिला धर्मोपदेश .......................... येथे दिला.

1) पाटलीपुत्र

2) बोध गया

3) सारनाथ

4) कपिलवास्तू


उत्तर - 3) सारनाथ





4. 2017 मध्ये जपानमधील काकामीगहारा येथे झालेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने (पेनल्टी शूटआउटमध्ये 5-4 गोल) कोणत्या देशात पराभव केला?

1) चीन

2) दक्षिण कोरिया

3) जपान

4) मलेशिया


उत्तर - 1) चीन




5. मार्च 2017 मध्ये G-20 लीडर्स इकॉनॉमिक समिट कोणत्या भारतीय शहरात आयोजित करण्यात आलेली होती?

1) बंगळूरू

2) हैदराबाद

3) वाराणसी

4) मुंबई


उत्तर - 3) वाराणसी




6. आधारभूत सुविधांसाठी आधार आवश्यक बनविण्याच्या संदर्भात 2017 वर्षाच्या युक्तिवादामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निणर्यांपैकी कोणता मुद्दा मुख्य होता?

1) शिधावाटप हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे.

2) गुप्तता हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे.

3) गोपनीयता हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.

4) देखरेखीखाली राहण्यापेक्षा स्वतंत्रपणे जगणे हे जास्त्‍ा महत्त्वाचे आहे.


उत्तर - 3) गोपनीयता हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.



7. खाली दिलेले एक विधान आणि दोन कृती काळजीपूर्वक वाचा आणि विधानावरून यांपैकी कोणती/त्या कृती तर्कसंगत आहेत ते निवडा.

विधान:
IMD च्या अहवालानुसार, बंगालच्या खाडीतील हवामानाच्या कमी दाबाच्या स्थितीमुळे तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.

कृती:

1. वेळेवर इशारा देण्यासाठी IMD ला पुरस्कृत केले पाहिजे.

2. सरकारने प्रसारमाध्यमांतून स्पष्ट इशारा दिला पाहिजे की मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये.

1) केवळ 2 तर्कसंगत आहे.

2) 1 आणि 2 यांपैकी एकही तर्कसंगत नाही.

3) दोन्ही 1 आणि 2 तर्कसंगत आहेत.

4) केवळ 1 तर्कसंगत आहे.


उत्तर - 1) केवळ 2 तर्कसंगत आहे.



8. ऐश्वर्या तेल क्षेत्र ........................ मध्ये आहे.

1) राजस्थान

2) मध्य प्रदेश

3) आसाम

4) उत्तर प्रदेश


उत्तर - 1) राजस्थान 



9. खालीलपैकी कोणते स्वदेशात बनवलेले आणि विकसित केलेले दीर्घ-श्रेणीचे सबसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे?

1) नाग

2) पिनाका

3) निर्भय

4) हेलिना


उत्तर - 3) निर्भय



10. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणता निष्कर्ष त्या विधानांचे पालन करतो(तात) ते ठरवा.

विधान:
सर्व कार चारचाकी आहेत.

सर्व चारचाकी वाहने आहेत.

निष्कर्ष:

1. सर्व कार वाहने आहेत.

2. काही वाहने चारचाकी आहेत.


1) केवळ निष्कर्ष 2 पालन करतो.

2) कोणताही निष्कर्ष पालन करत नाही.

3) सर्व निष्कर्ष पालन करतात.

4) केवळ निष्कर्ष 1 पालन करतो.


उत्तर - 3) सर्व निष्कर्ष पालन करतात.




11. खालीलपैकी कोणाला 2017 मध्ये ब्रिटिश संसदेत ग्लोबल ड्रायव्हर्सिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

1) रणबीर कपूर

2) आमिर खान

3) सलमान खान

4) अक्षय कुमार


उत्तर - 3) सलमान खान




12. पेटीएमचे संस्थापक कोण आहेत, ज्यांचा उल्लेख 2017 च्या TIME मॅगझिनच्या सर्वाधिक प्रभावशाली लोकांमध्ये मा. पंतप्रधान नंरेद्र मोदी यांच्यासमवेत करण्यात आला होता?

1) विजय शेख शर्मा

2) नंरेद्र कुमार

3) विजय मल्ल्या

4) विजय भास्कर


उत्तर - 1) विजय शेख शर्मा




13. खालीलपैकी कोणी "बिग बॉस-11" च्या हिंदी आवृत्तीचे यजमानपद भूषवले?

1) शिल्पा शेट्टी

2) फरहान अख्तर

3) आमिर खान

4) सलमान खान


उत्तर - 4) सलमान खान




14. एक विधान व त्यामागोमाग दोन गृहितके I व II दिलेली आहेत. विधान व पुढे येणार्‍या गृहितकांना विचारात घेऊन कोणते/ती गृहितक/के विधानात अंतर्निहित आहे हे ठरवा.

विधान:
वैश्विक उष्मावृध्दि, प्रजातींचे लोप पावणे व जंगलतोड पर्यावरणाला धोका उत्पन्न करत आहेत.

गृहितके:
I.  आपण आपल्या पर्यावरणाचा जितका जास्त गैरवापर करू व अधोगतीला नेऊ, आपण तितकाच पारिस्थितिकी तंत्राचा जास्त असमतोल निर्माण करून त्याच्या परिणामस्वरूपी मानवी जीवनाच्या अस्तित्तवाला जोखमीत टाकू.

II. प्रत्येक प्रजाती या तग धरण्यासाठी, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक अन्य प्रजातीवर निर्भर असतात. मानव प्रजाती अधिकतम इतर प्रजातींवर ना केवळ तग धरण्यासाठी तर आपल्या विकासाच्या गरजांसाठीही निर्भर असतात.


1) ना निष्कर्ष I ना II अंतर्निहित आहे.

2) केवळ निष्कर्ष I अंतर्निहित आहे.

3) दोन्ही निष्कर्ष I ना II अंतर्निहित आहेत.

4) केवळ निष्कर्ष II अंतर्निहित आहे..


उत्तर - 3) दोन्ही निष्कर्ष I ना II अंतर्निहित आहेत.





15. दिलेल्या विधानावरून कोणती गृहितके अंतर्निहित आहे हे ठरवा.

विधान:
एक शास्त्रज्ञ म्हणतो की, "झाडे जंगलातील इतर झाडांशी संवाद साधू शकतात आणि एकमेकांना पोषणमूल्ये वाटू शकतात."

गृहितके:
I.  झाडे इतर झाडांबरोबर अतिरिक्त पोषणमूल्ये वाटू शकतात. 

II. जमिनीखाली सगळे काही जोडलेल आहे.

1) फक्त गृहितक II अंतर्निहित आहे.

2)I किंवा II यांपैकी एकही गृहितक अंतर्निहित नाही.

3) फक्त गृहितक I अंतर्निहित आहे.

4) I किंवा II हि दोन्ही गृहितके अंतर्निहित आहे..


उत्तर - 3) फक्त गृहितक I अंतर्निहित आहे.





16. नाईंटी ईस्ट रिज ही कोणत्या महासागरातील पाण्याखाली ज्वालामुखी असणारी पर्वतरांग आहे?

1) अटलांटिक महासागर

2) प्रशांत महासागर

3) हिंदी महासागर

4) आर्क्टिक महासागर


उत्तर - 3) हिंदी महासागर




17. FSSAI ची कोणती योजना जी स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलाची तेल ते जैव-डिझेलला संकलन आणि रुपांतर करण्यास सक्षम करेल?

1) RUCO

2) RENO

3) RAMA

4) RUSA


उत्तर - 1) RUCO




18. पगलाडिया धरण कोणत्या राज्यात आहे?

1) नागालँड

2) मेघालय

3) आसाम

4) पश्चिम बंगाल


उत्तर - 3) आसाम




19.  कोणत्या ॲथलेटिक इव्हेंटमध्ये आशियाई ग्रांप्री ॲथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या लेगमध्ये मनप्रीत कौरने सुवर्णपदक पटकावले होते?

1) उंच उडी

2) गोळाफेक

3) लांब उडी

4) डिस्कस थ्रो


उत्तर - 2) गोळाफेक




20. पोर्तुगीजांनी कोणत्या साली गोवा ताब्यात घेतला होता?

1) 1512

2) 1515

3) 1516

4) 1510


उत्तर - 4) 1510




21. 2017 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणी राजीनामा दिला?

1) राहुल द्रविड

2) रवी शास्त्री

3) कपिल देव

4) अनिल कुंबळे


उत्तर - 4) अनिल कुंबळे




22. रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?

1) द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस

2) द अनसीन इंदिरा गांधी

3) द इमर्जन्सी - इंडियन डेमोक्रॉसीज डार्केस्ट अवर

4) आय डू, व्हॉट आय डू


उत्तर - 4) आय डू, व्हॉट आय डू




23. लोकसभेची कमाल संख्या किती आहे?

1) 545

2) 552

3) 548

4) 550


उत्तर - 2) 552




24. सदगुरू जगगी वासुदेव यांना भारत सरकारने त्यांच्या कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी 2017 मध्ये पद्य विभूषण पुरस्कार दिला होता?

1) अध्यात्मिकता

2) संगीत

3) राजकारण

4) क्रीडा


उत्तर - 1) अध्यात्मिकता 




25. 2018 फिफा विश्वचषक येथे गोल्डन बूट पुरस्कार कोणी जिंकला?

1) गॅबिंयाल जीझस

2) एंटोनी ग्रिझमन

3) हॅरी केन

4) लियोनेल मेस्सी


उत्तर - 3) हॅरी केन

No comments:

Post a Comment

SYBSc (CS) Sem III : Data Structure Slip 20 Que - 2

    SAVITIBAI PHULE UNIVERSITY OF PUNE S. Y. B.Sc. (Computer Science) Semester III Practical Examination       SUBJECT: CS-233 Practical cou...