युपीएससी एमपीएससी मुलाखतीतील प्रश्नोत्तरी
युपीएससीच्या परीक्षा या भारतात सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. या परीक्षेत पास होण्याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ज्यांनी आजवर आएएस च्या मुलाखती दिल्या आहेत त्यांना चांगलच ज्ञात आहे की, मुलाखत पास करणं सर्वात कठीण असे काम असतं. मुलाखतीत बरेच ट्रिकी प्रश्न वापरुन बर्याचदा मुलाखत देणार्याला हे प्रश्न गोंधळात आणुन सोडल्याशिवाय राहत नाहीत. बर्याचदा तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या पध्दतीने विचित्र प्रश्नांची लेव्हल ठेवल्या जाते. खरतरं या गोष्टी विदयार्थ्यांची आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठी केल्या जातात. मुळात एखादया गंभीर प्रसंगात तो विदयार्थी योग्य निर्णय घेण्यात किती सक्षम आहे हे यातुन तपासले जाते. बर्याचदा प्रश्न तिसर्या दिशेने विचारल्यागत असतो आणि उत्तर अगदी साध सोप्प असतं. अशावेळी विदयार्थ्यांनी आपलं डोकं स्थिर ठेवुन मुलाखत देणं गरजेचं असतं. आता अशाच डोक चक्रावुन सोडणार्या प्रश्नांची आपण इथे चर्चा करणार आहोत.
प्रश्न 1 - अशी कोणती गोष्ट आहे जी स्त्री व पुरुषाला केवळ रात्रीच हवीशी वाटते?
उत्तर - झोप
प्रश्न 2 - अशोकाच्या शिलालेखांना सर्वप्रथम कोणी वाचलं?
उत्तर - जेम्स प्रिंसेप
प्रश्न 3 - कॉग्रेसकडून पूर्ण स्वाधिनता हा प्रस्ताव केव्हा व कुठे प्रस्थापित झाला?
उत्तर - इस. 1929 मध्ये लाहोर येथील आधिवेशनात.
प्रश्न 4 - एक स्त्री सर्वांना ही गोष्ट देऊ शकते केवळ तिच्या पतीला सोडून.
उत्तर - राखी
प्रश्न 5 - कोणत्या देशात सूर्य मध्यरात्री चमकतो?
उत्तर - नॉर्वे
प्रश्न 6 - कोणत्या धातूचा वापर मानवाकडून सर्वप्रथम करण्यात आला?
उत्तर - तांबे
प्रश्न 7 - एक मनुष्य 12 किलोमीटर उत्तरेकडे, नंतर 15 किलोमीटर पूर्वेकडे, परत 19 किलोमीटर पश्चिमेकडे, परत 15 किलोमीटर दक्षिणेकडे जातो तर, तो मनुष्य त्याच्या प्रारंभिक बिंदूपासुन किती किलोमीटर दुर असतो?
उत्तर - पाच किलोमीटर
प्रश्न 8 -
11 + 11 = 4
12 + 12 = 9
13 + 13 = ?
उत्तर - हया प्रश्नामध्ये तुम्ही चांगले पाहीले असता असे लक्षात येईल की, बेरीजमध्ये दिलेल्या संख्येचे दोन्ही अंक आपण वर्ग केले आहेत. जसे की 11 मध्ये 1 आणि 1 हे मिळुन 2 बनवले आहेत, दोन चा वर्ग चार असतो त्यामुळे 11 + 11 = 4. अशाप्रकारे 12 या संख्येमध्ये 1 आणि 2 हे अंक जोडले गेले आहे त्यांची बेरीज 3 येते आणि 3 वर्ग 9 हा असतो म्हणून 12 + 12 = 9. अशाप्रकारे 13 या संख्येमध्ये 1 आणि 3 हे अंक जोडले गेले आहे. त्यांची बेरीज 4 येते आणि 4 चा वर्ग 16 हा असतो. म्हणजेच याचे उत्तर 13 + 13 = 16 येते.
प्रश्न 9 - अशी कोणती वस्तू आहे ती सतत पडत असते पण कधीच तुटत नाही?
उत्तर - पाऊस
प्रश्न 10 - IAS च्या परीक्षेमध्ये मुलीला विचारले गेले की अशी कोणती वस्तू आहे जी आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो?
उत्तर - तर त्या मुलीने खूपच सरळ पध्दतीने उत्तर दिले पानाला आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो. पान खाल्ल्यानंतर मजा सुध्दा येते.
प्रश्न 11 - राम आणि शाम दोघे जुळे भाऊ आहेत, दोघांचा जन्म मे मध्ये झाला आहे पण त्यांचा वाढदिवस जून मध्ये असतो असे का?
उत्तर - मे हे दोघांचे जन्म झालेले ठिकाण आहे.
प्रश्न 12 - हा प्रश्न एका मुलीला विचारला गेला होता. जर तुला एखादया सकाळी कळले की तू गरोदर आहेस तर तू काय करशील?
उत्तर - त्या मुलीने अगदी सहजपणे उत्तर दिले, मी खूप खुश होईल आणि ही गोष्ट माझ्या पतिला सांगेन.
प्रश्न 13 - एखादा मनुष्य आठ दिवस न झोपता कसा जिवंत राहू शकतो?
उत्तर - तो मनुष्य रात्री झोपत असेल.
प्रश्न 14 - जर निळया समुद्रामध्ये लाल रंगाचा दगड टाकल्यास काय होईल?
उत्तर - तो दगड ओला होईल.
प्रश्न 15 - अजिबात तडा जाऊ न देता काँक्रीट फ्लोअरवर तुम्ही अंड कस आपटाल?
उत्तर - कारण काँक्रीटची जमीन तडा जाईल इतकी कमकुवत नसते.
प्रश्न 16 - जर तुमच्या एका हातात 3 सफरचंद आणि 4 संत्री आहेत आणि दुसर्या हातामध्ये 4 सफरचंद आणि 3 संत्री आहेत, तर तुमच्याकडे काय असेल?
उत्तर - खूप मोठे हात
प्रश्न 17 - अर्धे सफरचंद कसे दिसेल?
उत्तर - दुसर्या अर्ध्या सफरचंद सारखे.
प्रश्न 18 - हा प्रश्न एका मुलाला विचारला गेला होता. मी तुझ्या बहिणी बरोबर पळून गेलो तर तू काय करशील?
उत्तर - यावर त्या मुलाने दिलेले उत्तर मला आनंदच होईल, कारण तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळने शक्यच नाही.
प्रश्न 19 - तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाऊ शकत नाही?
उत्तर - जेवन
प्रश्न 20 - जर 8 माणसांना एक भिंत बनवण्यासाठी 10 तास लागत असतील, तर तीच भिंत बनवण्यासाठी 4 माणसांना किती वेळ लागेल?
उत्तर - काहीच वेळ लागणार नाही, कारण भिंत आधीच बनलेली आहे.
बर्याचदा आएएस व आपीएस या उच्च व जबाबदारीच्या पदांसाठी आयक्यू लेव्हल चांगला असणं खूपच महत्वाचं ठरतं, त्याच कारणास्तव मुलाखतींना विशेष महत्त्व आहे. या मुलाखतींचा मुळ उद्देश हाच असतो की, इथपर्यंत कॅपेबल ठरलेला विदयार्थी इथुन पुढेही त्याच्या चातुर्याच्या बळावर पदावर आरुढ व्हावा. केवळ यासाठीच आयक्यू लेव्हल तपासणं हे गरजेचे ठरतं.
No comments:
Post a Comment