नमस्कार, मी सुनिल भागवत आजपासुन आपण सुरु करणार आहोत कॉम्पुटरची सर्वात लोकप्रिय झालेली भाषा म्हणजेच लँग्वेज जिचे नाव आहे C Language बद्दलच्या टॉपिकला.
C language येण्याआधी खुप language येवुन गेल्या होत्या पण सर्वाधिक लोकप्रिय झाली तर ही लँग्वेज. सुरवातीला अधिक जाणून घेण्याआधी आपण ही लँग्वेज कशी असते ते आधी बघू.
C language चा पहिला Program...
#include<stdio.h>
int main() {
printf("Sunil Bhagwat");
return 0;
}
हा आपला साधा C Language चा program आहे, जो केवळ कॉम्पुटरच्या स्क्रिनवर Sunil Bhagwat हे नाव दाखवेल.
आता याबद्दल आपण अधिक जाणून घेवू. #include<stdio. h> ही header file (हेडर फाईल) आहे कि, ज्यामध्ये सर्व पुन्हा पुन्हा वापरात येणारी फंक्शन्स (functions), datatype, varibles लिहून ठेवलेली असतात. जसे की , printf, scanf, int, float, double, इत्यादी.
int main() हे मुख्य फंक्शन आहे. जेथून आपली operating system आपल्या program मध्ये प्रवेश करते व त्यात दिलेल्या सूचनांचे अनुसरण करते. जसे की, या program मधे असलेली सुचना printf("Sunil Bhagwat"); या सुचनेचे अनुसरण करेल. या सुचनेचा अर्थ असा आहे की, हे कॉम्पुटर म्हणजे त्यातील operating system माझ्या या program मधील माझे नाव "Sunil Bhagwat" हे कॉम्पुटरच्या स्क्रिनवर म्हणजेच मॉनिटरवर print कर. हे काम printf या function चे आहे. Program मधील main function हे आपल्या program चा मुख्य दरवाज्याची भुमिका बजावते. या दरवाजातुन एकदा प्रवेश केला मग आपण इतर खोल्यामध्ये प्रवेश करतो तसेच आपण program मधील इतर function मध्ये प्रवेश करतो. हे आपण पुढे बघणारच आहोत...
शेवटी return 0 हे वाक्य operating systemला सांगते की, मी माझे काम सुरळितपणे पूर्ण केले आहे. जर हे काम पूर्ण करताना काही समस्या आली तर return 0 ऐवजी वेगळे numbers पाठवले जातात. हे कुठले कोड किंवा numbers असतात यबद्दल आपण नंतर अधिक जाणुन घेणार आहोतच...
अशा प्रकारे आपण C Language चा पहिला program म्हणजे application पूर्ण केला आहे.
हा program तुम्ही turbo C किंवा visual studio या IDE वरती रन करु शकता. हे IDE तुम्हाला Internet वरती मिळतील. जर तुम्हाला हे IDE कसे Installed करायचे हे जाणुन घेण्यासाठी मला comment करा. नक्कीच तुमची मदत केली जाईल.
तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला याबद्दल जरुर आपले मत मला comment करा. आवडल्यास like व share करा.
No comments:
Post a Comment